आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम जन्मभूमी मंदिर:गोविंददेव गिरी महाराजांचे 19 जानेवारीपासून व्याख्यान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यास, मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे विश्वस्त गोविंददेव गिरी महाराज (आचार्य किशोर व्यास) यांचे व्याख्यान १९ ते २१ जानेवारीदरम्यान संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चिकलठाणा एमआयडीसीतील महेश भवनमध्ये हाेणार आहे. समन्वय परिवार औरंगाबाद तसेच सेठ रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट, अहमदनगर यांनी हा कार्यक्रम आयाेजित केला आहे.

‘परिवार सुखी कैसे रहे?’, ‘सांस्कृतिक परंपराओं का महत्व’, ‘सार्थक जीवन’ या तीन विषयांवर गिरी बोलतील. १९ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता जन्मोत्सव, तर २० जानेवारीला गीता परिवाराच्या वतीने योग पिरॅमिड तथा गुरू भक्ती गीत प्रस्तुती कार्यक्रम ७ वाजता होणार आहे. २१ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता नागरी सत्कार करण्यात येईल. या वेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन किशोरीलाल धूत, राधावल्लभ धूत, दीपक लड्डा, शिवप्रसाद तोतला यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...