आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:लिजेंड क्रिकेट लीग स्पर्धेत तृप्ती संघाने एकात्म क्लबला 8 गड्यांनी हरवले, इनायत अली सय्यद सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या लिजेंड क्रिकेट लीगमध्ये तृप्ती संघाने विजय मिळवला. रविवारी झालेल्या लढतीत तृप्ती संघाने एकात्म क्लबवर 8 गडी राखून मात केली. या लढतीत इनायत अली सय्यद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकात्म संघाने 20 षटकांत 7 बाद 168 धावा उभारल्या. यात सलामीवीर पांडुरंग गाजेने 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचत 35 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर सतिश भुजंगेने 10 चेंडूंत 19 धावा ठोकल्या. सतिश व पांडुरंग जोडीने पहिल्या गड्यासाठी 31 धावांची भागीदारी केली. अशोक शिंदेने 16 धावा केल्या. हरमितसिंग शुन्यावर निखिल मुरुमकरचा शिकार बनला. त्यानंतर आलेल्या सिद्ध जैनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचत 57 धावांची खेळी केली. कर्णधार रणजीत 13 व मनोज ताजी 6 धावा करुन परतला. अब्दुल करीम 2 धावांवर नाबाद राहिला. तृप्तीकडून राजू मदनने 3 गडी बाद केले. गिरिश खत्री व निखिल मुरूमकरने प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.

इनायतचे नाबाद अर्धशतक

प्रत्युत्तरात तृप्ती संघाने 17.3 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. संघाची सुरुवात खराब झाली. निखिल चौधरी अवघ्या 5 धावांवर परतला. त्यानंतर विशाल नरवडे व इनायत अली सय्यदने संघाची सुत्र आपल्या हाती घेत संघाला विजय मिळवून दिला. विशालने 34 चेंडूंत 7 चाैकार व 1 षटकार लगावत 45 धावा काढल्या. इनायतने 49 चेंडंूत 15 चाैकारांच्या मदतीने नाबाद 83 धावांची विजयी खेळी केली. भास्कर जीवरग 28 धावांवर नाबाद राहिला. मनाेज ताजीन एक बळी घेतला.