आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीजेंड क्रिकेट लीग:एक्का लॉयन्सने साई श्रद्धा इलेव्हनला हरवले, अतुल वालेकरची अष्टपैलू कामगिरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी स्टेडियमवर सुरू असलेल्या लीजेंड क्रिकेट लीगमध्ये एक्का लॉयन्सने साई श्रद्धा इलेव्हन संघावर 6 गडी राखून मात केली. शनिवारी झालेल्या लढतीत अतुल वालेकर (42 धावा, 4 बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साई श्रद्धा इलेव्हनने 19.4 षटकांत सर्वबाद 140 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात एक्का लॉयन्सने 14.4 षटकांत 4 गडी गमावत 142 धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर रवींद्र बोडखेने 13 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 15 धावा केल्या. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार 27 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 42 धावा ठोकल्या. रोहन शाह 5 धावांवर परतला. सय्यद जावेदने 17 चेंडूंत फटकेबाजी करत 5 चौकार व 1 षटकार मारत नाबाद 31 धावा ठोकल्या. त्याला साथ देत संदीप लहानेने 31 धावा केल्या. त्याने 12 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचले. साई दहाळे 9 धावांवर नाबाद राहिला. साईकडून गज्जू काटकरने 2 आणि वैभव कोलते, विनोद यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.

मंगेश निठूरकचे अर्धशतक व्यर्थ

तत्पूर्वी, साई श्रद्धा इलेव्हनकडून सलामीवीर मंगेश निठूरकरने अर्धशतक झळकावले. मात्र, संघाचा पराभव झाल्याने त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने 49 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचत 61 धावा ठोकल्या. विनोद यादवने 34 चेंडूंत 2 चौकारांसह 26 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. आघाडीचे तीन फलंदाजा भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यामुळे संघाचा पराभव झाला. एक्काकडून अतुल वालेकरने 24 धावा देत 4 फलंदाज बाद केले. सय्यद जावेदने 2 आणि सागर जावळेने 3 बळी घेतले.