आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:लिजेंड लीग : एक्का लायन्सने साई श्रद्धा इलेव्हनला हरवले, वालेकर सामनावीर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी स्टेडियमवर सुरू असलेल्या लिजेंड क्रिकेट लीगमध्ये एक्का लायन्सने साई श्रद्धा इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली. शनिवारी झालेल्या लढतीत अतुल वालेकर (४२ धावा, ४ बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.प्रथम खेळताना साई श्रद्धाने १९.४ षटकांत सर्वबाद १४० धावा उभारल्या. प्रत्युत्तरात एक्का लॉयन्सने १४.४ षटकांत ४ गडी गमावत १४२ धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर रवींद्र बोडखेने १५ धावा केल्या.

कर्णधार २७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचत सर्वाधिक ४२ धावा ठोकल्या. सय्यद जावेदने १७ चेंडूंत करत ५ चौकार व १ षटकार मारत नाबाद ३१ धावा ठोकल्या. त्याला साथ देत संदीप लहानेने ३१ धावा केल्या. साईकडून गज्जू काटकरने २ आणि वैभव कोलते, विनोद यादवने प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

निटूरकरचे अर्धशतक व्यर्थ तत्पूर्वी, साई श्रद्धा इलेव्हनकडून सलामीवीर मंगेश निटूरकरने अर्धशतक झळकावले. मात्र, संघाचा पराभव झाल्याने त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने ४९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचत ६१ धावा ठोकल्या. विनोद यादवने ३४ चेंडूंत २ चौकारांसह २६ धावा केल्या. एक्काकडून अतुल वालेकरने २४ धावा देत ४ फलंदाज बाद केले. सय्यद जावेदने २ व सागर जावळेने ३ बळी घेतले.