आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी राज्य शासनाने आनंदाची बातमी देत राज्यभरात 18 हजार 331 जागांसाठी पोलिस भरतीची अधिकृत घोषणा करुन भरती प्रक्रियेची शासनस्तरावर जाहिरात प्रकाशित केली; त्यात बॅन्ड्समनची पदे वगळण्यात आल्याने त्याचा समावेश करावा आणि महाराष्ट्र कारागृह सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्यांच्या पाल्यांना आरक्षण देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन त्यासंबंधीचे पत्र पोलिस महासंचालक व औरंगाबाद पोलिस आयुक्तांना सुध्दा दिले.
सेवानिवृत्त कारागृह पोलिस कर्मचार्यांच्या पाल्यांनी आणि पोलिस विभागात बॅन्ड्समन पदांकरिता सराव करत असलेल्या युवक व युवतींनी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेवुन सविस्तर माहिती दिली; युवकांच्या भवितव्याचा विचार करुन खासदार इम्तियाज जलील यांनी त्वरीत सबब प्रकरणी पत्र पाठविले. खासदार इम्तियाज जलील यांनी निवृत्त कारागृह पोलिस कर्मचार्यांच्या पाल्यांसंबंधी दिलेल्या पत्रात नमुद केले की, महाराष्ट्र पोलिस भरतीच्या अटी, शर्ती व नियमाप्रमाणेच सन 2015-16 मध्ये कारागृह पोलिस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच वर्ष 2003 पासून महाराष्ट्र पोलिस व कारागृह पोलिस यांचे सर्व प्रकारचे भत्ते, विविध योजना समान करण्यात आलेले आहे. दोन्ही विभागातील कर्मचार्यांचे कामाचे स्वरुप जवळपास समानच असल्याचे कारागृह पोलिस कर्मचार्यांच्या पाल्यांनी निदर्शनास आणुन दिलेले आहे.
महाराष्ट्र पोलिस विभागातून सेवानिवृत्त व मयत पोलिस कर्मचार्यांच्या पाल्यांना पोलिस भरतीत यापूर्वी आरक्षण दिलेले आहे. त्याच धर्तीवर आगामी होत असलेल्या पोलिस शिपाई भरतीत सेवानिवृत्त महाराष्ट्र कारागृह पोलिस कर्मचार्यांच्या पाल्यांना सुध्दा आरक्षण हवे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनातर्फे पोलिस शिपाई संवर्गातील विविध पदे भरती करणेसंबंधी राज्यस्तरावर जाहीरात प्रसिध्द करण्यात येते. त्यामध्ये पोलिस शिपाई संवर्गात चालक, खेळाडू, बॅन्ड्समन, पोलिस पाल्य व इतर यांच्यासाठी काही पदे राखीव असते. यावर्षी सुध्दा महाराष्ट्र शासनातर्पेâ पोलिस शिपाई संवर्गात विविध पदांची भरतीची जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये बॅन्ड्समन हे पद वगळण्यात आले असल्याचे बॅन्ड्समन या पदाकरिता अनेक वर्षापासुन मेहनत करत असलेल्या युवक-युवतींनी निदर्शनास आणुन दिल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी बॅन्ड्समन संबंधी गृहमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमूद केले.
महाराष्ट्र राज्यात अनेक होतकरु तरुणांनी विविध संगीत संस्था मधून संगीताचे प्रशिक्षण घेवुन महाराष्ट्र पोलिस दलात सामील होऊन नावलौकीक वाढविण्याचे निश्चित केलेले होते. परंतू अचानक बॅन्ड्समन पदे वगळण्यात आल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाल्याचे पत्रात नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.