आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन:मनपाचे आराेग्य विभागप्रमुख; तीन उपायुक्तांचे वेतन थांबवण्यासाठी पत्र

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपात स्थानिक अधिकारी आणि राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. सहापैकी तीन उपायुक्त आणि आरोग्य विभागाच्या प्रमुखांचे वेतन थांबवण्यात यावे, असे पत्र मुख्य लेखा परीक्षक देविदास हिवाळे यांनी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहे. मनपात उपायुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. परंतु सध्या सहा कार्यरत आहेत. यात आस्थापनेवरील दाेन आणि प्रतिनियुक्तीवर आलेले चार अधिकारी आहेत.

तीन उपायुक्तांना रुजू करून घेणे आणि त्यांना वेतन देणे नियमात बसत नाही. आरोग्य विभागप्रमुख डॉ. पारस मंडलेचा यांचेही वेतन थांबवण्याची शिफारस या पत्रात आहे. मंडलेचा हे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अधीक्षक संवर्गातील अधिकारी आहेत. मनपातील आरोग्य विभागप्रमुख पद त्यापेक्षा वरिष्ठ आहे. या पदाची शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी मंडलेचा यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना कायम ठेवून वेतन देणे अयोग्य आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

नवीन आकृतिबंधात उपायुक्तांची पाच पदे
नगरविकास खात्याने ऑगस्ट २०२१ मध्ये मनपाचा सुधारित आकृतिबंध मंजूर केला. त्यात उपायुक्तांची पाच पदे होती. शिवाय वर्गीकरणाच्या २००६ च्या अध्यादेशात उपायुक्तांची तीनच पदे मंजूर आहेत. त्यामुळेच मुख्य लेखा परीक्षकांनी पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. रवींद्र निकम, अपर्णा थेटे हे अधिकारी स्थानिक आहेत. तर संतोष टेंगळे, सोमनाथ जाधव, राहुल सुर्यवंशी, नंदा गायकवाड हे शासनाकडून आलेत.

बातम्या आणखी आहेत...