आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपाटीकरण:लेबर कॉलनीतील घरांचा तीनशे ट्रक मलबा काढून जमिनीचे सपाटीकरण ; 60 कामगारांचा राबता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनी येथील घरे पाडल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मलब्याचे ढिगारे जमा झाले होते. परंतु ते ढिगारे २० दिवसांत १३ टिप्पर, १० ट्रॅक्टर व ६० मजुरांच्या साह्याने विद्यापीठशेजारील खाम नदीच्या पात्रालगत टाकण्यात आले. त्यामुळे लेबर कॉलनी परिसराचे रूपांतर आता मैदानात झाले आहे. लेबर कॉलनीतील रहिवाशांनी राहत्या घराचा मालकी हक्क मिळावा म्हणून दीर्घकाळ न्यायालयीन लढाई लढली होती. परंतु न्यायालयाचा निकाल रहिवाशांविरोधात गेल्याने प्रशासनाने लेबर कॉलनीतील इमारती ११ मे रोजी तोडण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत ९० टक्के इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मलब्याचे ढिगारे झाले होते. ते ठेकेदाराच्या साहाय्याने २० दिवसांत खाम नदीपात्राच्या कड्यावर टाकण्यात आले. जुन्या झालेल्या इमारती या १५ जेसीबीच्या साहाय्याने तोडल्या, तर मोठ्या इमारती ४ पोकलेनच्या साह्याने पाडल्या. त्या ठिकाणचे लोखंडी पत्रे, सळया, कंपाउंड गेट हे काही रहिवासी घेऊन गेले, तर काही भंगार वेचकांनी नेले होते. आता लेबर कॉलनीतील पूर्ण जमीन सपाटीकरण केली आहे. त्यामुळे चांदणे चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे प्रवेशद्वार स्पष्ट दिसत आहे.

लेबर काॅलनीतील घरे पाडण्याचे काम रुद्रा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. तसेच आर. के. कन्स्ट्रक्शननेही काम केले. त्यात ११ ते ३० मेदरम्यान १५ जेसीबी, १३ टिप्पर, १० ट्रॅक्टर, ४ पोकलेनच्या साहाय्याने इमारती पाडून जमीनदोस्त केल्या. या कामी ६० कुशल व अकुशल कामगारांनी काम केले, अशी माहिती आर. के. कन्स्ट्रक्शनचे असद चाऊस यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...