आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्मा स्मारक:नऊ कोटींतून आठ हुतात्मा स्मारकांत ग्रंथालय, अभ्यासिका ; विजय स्तंभावर सैनिकांची यशोगाथा मांडणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजांच्या ताब्यातून १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. मात्र, हैदराबाद निझामाच्या राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. त्यामुळे स्वातंत्र्याचे ७५ वे स्वातंत्र्य वर्ष म्हणून ज्याप्रमाणे ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा केला जात आहे, त्याप्रमाणेच हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सवही साजरा व्हावा यासाठी राज्य शासनाने ७५ कोटींचा निधी दिला आहे. यातून औरंगाबाद जिल्ह्यात ९ कोटींतून ८ स्मारकांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. हैदराबाद मुक्तिसंग्रामात अनेकांनी प्राणांची आहुती दिली होती. या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून जिल्ह्यात आठ ठिकाणी उभारलेल्या हुतात्मा स्मारकांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. स्मारकासमोर विजय स्तंभ उभारण्यात येणार आहे. या स्तंभावर त्या-त्या भागातील हुतात्म्यांची यशोगाथा लिहिली जाईल, जेणेकरून त्या भागातील नव्या पिढीला हुतात्म्यांची माहिती मिळेल. प्रत्येक जिल्ह्याने असे कल्पक उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. औरंगाबादच्या कामाचे प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे काम करत आहेत. ते म्हणाले, काम वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील आठ स्मारकांचे पुनरुज्जीवन करून मुक्तिसंग्राम दिनाला लोकार्पण केले जाईल.

हुतात्मा स्मारक हुतात्म्यांचे नाव गाव { लाडसावंगी काशीनाथ म्हस्के हातमाळी { बोरगाव अर्ज सांडुजी वाघ बोरगाव अर्ज { धानोरा जयाजी साळुंके, धानोरा श्रीपत भिवराव साळुंके, सांडू साळुंके, तात्याबा साळुंके { जरंडी विश्वनाथ राजहंस जरंडी { फर्दापूर हिरालाल जैस्वाल, फर्दापूर तुळशीराम जैस्वाल, दगडू बलांडे, सादव बालांडे, सांडू बालांडे, तुकाराम वाघ, नामदेव वाघ, गोविंदा साबळे. { पैठण भाऊराव कानडे दांगटपुरी { जातेगाव जगजीवनराम, जगन्नाथ भालेराव, महाकाळवड गंगाधर पेरेवार. { वैजापूर जगन्नाथ भालेराव महाकाळवड

बातम्या आणखी आहेत...