आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्यात घडलेल्या विविध घटना, आठवणी या आधारावर ज्येष्ठ जीवन जगत असतात. परंतु जीवन जगणे एक उत्सव असतो, अन् तो आनंदाने जगायला शिकले पाहिजे. आलेल्या सुख-दु:खातून सावरत सकारात्मकतेने जीवन जगायला हवे, असे मत मी माझ्या “सेकंड इनिंग’ पुस्तकातून मांडले असल्याचे प्रा. रमेश कुलकर्णी म्हणाले. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे गुरुवारी गीता भवनात प्रा. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेेचे अध्यक्ष भरतकुमार कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
प्रा. कुलकर्णी म्हणाले, उतारवयात योग्य वातावरण न मिळाल्यास नैराश्य वाढते. त्यावर मात करत ज्येष्ठांनी सकारात्मकतेने जीवन जगावे. लोकांशी संवाद साधावा. आध्यात्मिकतेकडे ओढा वाढवावा. छंदही जोपासावे, विविध उपक्रमांत सहभाग नोंदवावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.