आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्पायरिंग:‘आयुष्य एवढे सहजसोपे हवे की तुमच्या आवड आणि मूल्यांवर पावले पडावीत’

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘व्यवहार, जीवनाचा भाग आहे. त्याला त्यापासून वेगळे करता येत नाही. दुहेरीपण ही अडचण आहे. स्वत:ची आवड आणि मूल्यांसोबत चालणारे आयुष्यच व्यतीत करणे मला आवडेल. त्या जीवनात ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे स्थान आहे. संधीपासून खूप लांबवर बसलेल्या व्यक्तीला ती पोहोचवणेही गरजेचे. कामासोबतच देशाच्या वास्तविक समस्यांशी दोन हात करणे आणि समाजावर सकारात्मक परिणाम होणे अतिशय महत्त्वाचे.

मला वाटते की जेवढे शक्य असेल तेवढे कमीत कमी तणावाचे काम मी घेईन. जे लोक जास्त दबावात काम करतात ते आपल्या आरोग्याशी तडजोड करतात. मला माझ्यासाठी आणि माझ्या कर्मचाऱ्यांसाठी असे वातावरण अिजबात नको. मला वाटते की माझ्या कर्मचाऱ्यांनीही गावांत राहावे. त्यामुळे विचारांचे उत्तमप्रकारे आदान-प्रदान होऊ शकेल. अधिक कमाई करणारे लोक गावांत पोहोचले की अनेक चांगल्या आणि वाईट सवयीही त्यांच्याबरोबर पोहोचतात. आपण चांगल्या सवयींवर लक्ष केंद्रित केले तर लोकांना एक चांगला मार्गदर्शक मिळेल. त्यांना शिकवण मिळेल. शहरी लोक गावांतील मंडळींकडून शिकतील. हे चांगले आदान-प्रदान आहे.

तुम्ही गावात राहता तेव्हा अनावश्यक तणाव आपोआप लांब जातो. जसे की माझ्या शेजाऱ्याकडे फरारी आहे, तो परदेशात सुटी घालवत आहे आदी. जीवनाचे सहजपण तुम्हाला माहीत आहे. मी नेहमीच कमी गोष्टींत जीवन व्यतीत करत आलो. नवा फोन आला की लगेच घेणाऱ्या लोकांपैकी मी नाही. त्याला येऊन एक-दोन वर्षे उलटली आणि तो सर्वांकडे आला की मग मी घेतो. मी स्वत:कडून आणि माझ्या लोकांकडून शहरांना ‘न राहण्यालायक’ बनवू इच्छित नाही. (सोशल मीडियातील मुलाखतीत जोहोचे संस्थापक पद्मश्री श्रीधर वेम्बू )

बदल मध्यमवर्गापासून नव्हे, खालपासून सुरू होईल भारतीय व्यवस्था निर्माणावर आधारित आहे. ती बदलण्याची गरज आहे. नेल कटर कसे बनते हे जाणून घेण्याची गरज नाही. शाळेत आणि व्यवहारात एवढ्या बेसिक गोष्टींवर भर देण्याची गरज नाही. व्यावहारिकता गरजेची आहे. हा बदल मध्यमवर्गापासून येऊ शकत नाही. बदल खालपासून सुरू होईल. जेव्हा एखादे स्टार्टअप गांवातील शाळेत मोफत जेवण, मोफत शिक्षण देईल तेव्हा आपोआप लोकांचा व्यावहारिकतेवर विश्वास बसेल.

संधी निर्माण करण्यावर सारे लक्ष केंद्रित असावे प्रेम करण्याची आपली क्षमता कधीच कमी होऊ देऊ नका. कॉम्प्युटर कधीच वस्तू खरेदी करत नाही. लोक खरेदी करतात आणि त्यांच्याकडे त्यासाठी कारण असते. तुम्हाला ग्राहकाशी दीर्घ नाते हवे असेल तर पैसा विसरून जा. त्यांच्याशी व्यवस्थित व्यवहार करा. मी संचितावर लक्ष केंद्रित करतो, मूल्यांकनावर नाही. कर्मचाऱ्यांशी पारदर्शक राहा. कंपनीकडे पैसा नसेल तर सर्वप्रथम हे त्यांनाच सांगा. संधी निर्माणावर लक्ष केंद्रित करा.

बातम्या आणखी आहेत...