आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण कार्यशाळा:‘लाइफ स्किल्स’ हेच यशाचे प्रवेशद्वार : डॉ. साखळे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्यांना ‘लाइफ स्किल्स’ असे संबोधले जाते. ‘लाइफ स्किल्स’ हेच आता कोणत्याही क्षेत्रातील यशाचे प्रवेशद्वार आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी व्यक्त केले. हिंदी विभागात ‘बर्केल्स लाइफ स्किल्स’ प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. भारती गोरे होत्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीश काळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. डॉ. साखळे म्हणाले, जीवन कौशल्य विकास कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एक नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळतो. विद्यार्थ्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक विचार समजून घेता आले पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले विविध गुण तुम्ही योग्य वेळी जाणून घेऊ शकता. अशा कार्यशाळेतून व्यक्तिमत्त्व कौशल्य, संवाद कौशल्य, मुलाखत कौशल्यांचा विकास करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. प्रा. दत्तात्रय किटाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माजिद पटेल यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...