आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 परिषदे:तीन काेटी रुपये खर्च करून 16 रस्त्यांवर लावणार दिवे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात होणाऱ्या जी-२० परिषदेनिमित्त शहरातील १६ रस्त्यांवर तीन कोटी रुपये खर्चून पथदिवे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

ज्या रस्त्यांवर पथदिव्यांची नितांत गरज आहे, असे रस्ते निवडण्यात आले आहेत. दोन टप्प्यांत पथदिवे बसवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ११ रस्त्यांवर दोन कोटी तर इतर रस्त्यांवर ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीतील परिषदेसाठी शासनाने महापालिका प्रशासनाला ५० कोटींचा निधी दिला आहे. यातून प्रशासनाने विविध विकासकामे हाती घेतली आहेत.

बातम्या आणखी आहेत...