आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:नाशिक-पुण्याप्रमाणे मराठवाड्याच्या रेल्वेसाठीही राज्य सरकारने भार उचलावा : केंद्रीय मंत्री दानवे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक, पुणे रेल्वेमार्गांसाठी राज्य सरकार ७०% निधी देण्यास तयार आहे. असाच भार औरंगाबाद-चाळीसगाव, औरंगाबाद-नगर-पुणे मार्गासाठीही उचलावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केले.

रेल्वे अर्थसंकल्प पूर्वतयारीचा भाग म्हणून नांदेड रेल्वे विभागातील मराठवाडा-विदर्भातील खासदारांची बैठक औरंगाबादेत दानवेंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नांदेड-मनमाड विद्युतीकरण, औरंगाबादेत पिटलाइन, शिवाजीनगरात भुयारी मार्गासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. हे मुद्दे रेल्वे बोर्डापुढेही मांडले जातील. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना औरंगाबादेत समृद्धी महामार्गाजवळ रेल्वेमार्ग सुरू करण्याविषयी त्यांच्याशी चर्चा करून पत्रही दिले. या प्रकल्पासाठी राज्य सरकार ५०% निधी देणार आहे. पंतप्रधानांनी देशात ७ प्रकल्पांना चालना देण्याचे ठरवले आहे. त्यात हा प्रकल्प असून त्यासाठी सर्वेक्षण होत आहे. मुदखेड ते मनमाड दुहेरीकरण अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असेही दानवे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...