आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट माल:लूटमारीचे लिंकिंग..! ; कमिशनसाठी निकृष्ट माल शेतकऱ्यांच्या माथी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक-दोन चांगले पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या कृषी बाजारपेठेत बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. वर्षानुवर्षे ज्या कंपनीचे बियाणे-खतांपासून चांगले उत्पादन मिळते तीच घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र या मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करून निकृष्ट दर्जाचा माल शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम विक्रेत्यांकडून सर्रास सुरू आहे. ठरावीकच बियाणे, खते हवी असतील तर नव्याने बाजारात आलेला काही मालही (लिकिंगची खते-बियाणे) त्यासोबत बळजबरीने घेण्याची सक्ती केली जात आहे. आर्थिक अडचणीत असलेले अनेक शेतकरी उधारीवर खरेदी करत असल्याने विक्रेत्यांकडून होणारी ही मुस्कटदाबी सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. याचाच गैरफायदा घेत अनेक निकृष्ट बियाणे-खतांच्या कंपन्या दुकानदारांना सुमारे ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमिशनचे आमिष दाखवून आपला निकृष्ट माल खपवत आहेत. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने जाधववाडी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे जाऊन डीएपी, १०.२६.२६ रासायनिक खतांची मागणी केली. याच खतांना सर्वाधिक शेतकऱ्यांची पसंती असते. मात्र अनेक विक्रेत्यांनी हे खत आमच्याकडे सध्या उपलब्ध नसल्याचे सांगितले. प्रतिनिधीने बराच वेळ तेथे थांबून निरीक्षण केले असता या विक्रेत्यांनी काही शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार डीएपी, १०.२६.२६ खते दिली, मात्र त्यासोबतच इतर दुय्यम दर्जाच्या कंपन्यांची खतेही त्यांच्या माथी मारून पैसे उकळले. ही लिंकिंगची खते घेतली तरच पाहिजे ती खते मिळतील, अशी अटही दुकानदारांकडून घातली जात होती. अशा प्रकारे कृत्रिम टंचाई करून खताच्या एका गोणीमागे कमीत कमी २०० ते ५०० रुपये जादा दर आणि लिंकिंगचे ५०० रुपये किमतीचे निकृष्ट दर्जाचे खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत दिसून आले. भरारी पथके सुस्त : ब्रँडेड कंपन्यांच्या खत-बियाण्यांबरोबरच दरवर्षी नवनवीन कंपन्यांची उत्पादने बाजारात उर्वरित. पान ४ ९४२१२३३२७० वर करा तक्रार Ãखत व बियाणे मिळत नसतील व नको असलेले खते व बियाणे माथी मारत असेल किंवा जादा दर आकारणी केली जात असेल तर कृषी विभागाच्या विभागीय तक्रार निवारण कक्षात ९४२१२३३२७० या क्रमांकावर तक्रार करण्याची शेतकऱ्यांना साेय आहे. कृषी अधिकारी व कर्मचारी तुमच्या मदतीला धावून येतील. गैरप्रकार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच विक्रेत्यांचे परवाने तडकाफडकी निलंबित केले जातील. - दिनकर जाधव, कृषी सहसंचालक, औरंगाबाद युरिया ३५०४० डीएपी ९२४७ एमओप १५९० एनपीके२२४४९ एसएसपी२१३४४ एकूण८९६७० उपलब्ध खतसाठा (मे.टन) दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह

बातम्या आणखी आहेत...