आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Lions Plastic Surgery Camp : Through 'Lions' 46 Years Ago, Dr. Dixit Had Performed 2 Surgeries, Today The Lives Of 13 Thousand 436 Patients Have Changed

मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर 13 सप्टेंबरपासून:'लायन्स'मधून डॉ. दीक्षितांनी केला श्रीगणेशा, 13 हजार 436 रुग्णाचे आयुष्य बदलले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'लायन्स'च्या माध्यमातून 13 सप्टेंबरपासून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मंगळवारी देण्यात आली.

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत या शिबिराचा कार्यक्रम सांगितला. पत्रकार परिषदेला एमजीएम रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपप्रमुख प्लास्टिक सर्जन डॉ. उज्वला दहिफळे, लायन्सचे कल्याण वाघमारे उपस्थित होते.

कशी झाली सुरुवात?

अग्रवाल म्हणाले की, ​​​​​घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेले असताना जोरदार पावसामुळे डॉ. शरद दीक्षित हॉटेलमध्ये अडकले. त्याचवेळी लायन्सची एक बैठक तिथे सुरू होती. या दरम्यान घडलेल्या संवादातून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे बीजारोपण झाले. अन् औरंगाबादेत १९७६ मध्ये दोन रुग्णांच्या शस्त्रक्रियेपासून या शिबिराला सुरुवात झाली. आतापर्यंत १३ हजार ४३६ जणांवर मोफत शस्त्रक्रिया करून हजारोंचे आयुष्य या शिबिराने उजळले आहे. यंदाचे शिबिर १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

यंदा पाचशे शस्त्रक्रिया

डॉ. सूर्यंवशी म्हणाले, लायन्स या शिबिराशी एमजीएम अनेक वर्षांपासून जोडले गेले आहे. यानिमित्ताने सामाजिक उपक्रमात आमचाही हातभार लागतो. पहिल्या दिवशी तपासणी झालेल्या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रीया एमजीएमच्या शस्त्रक्रीयागारात केल्या जातील. यंदा ५०० हून अधिक शस्त्रक्रिया पार पाडण्याचा आमचा मानस आहे.

येथे साधा संपर्क

सहप्रकल्प प्रमुख कल्याण वाघमारेंनी सांगितले की, आमच्या या शिबिरासाठी केमिस्ट अ‌ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे मोठे याेगदान आहे. दरवर्षी लागणारे सर्जिकल साहित्य आणि औषधींचा वाटा ते उचलतात. तर, एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर्स शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेतात. १३ सप्टेंबरला लायन्स आय हॉस्पिटल, एन-१, सिडको येथे शिबिराचे उदघाटन होईल. दिवसभर तपासणी होईल. निवड झालेल्यांच्या शस्त्रक्रियांना १४ पासून सुरुवात होईल. सहभागाकरिता ९३७३०२८५१६/ ७७७६०४४५४४/ ९३७१७१७१२५/ ९१५८७७८७७९ संपर्क साधावा, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...