आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांचे आवाहन:जी-20 साठी लायन्सने सजावटीस योगदान द्यावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य” हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जी-२० परिषदेसाठी लोकसहभागातून शहर स्वच्छतेस प्रारंभ होणार आहे. लायन्स क्लबने शहर सजावटीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. लायन्स क्लबच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी डॉ. कराड बोलत होते. प्रांतपालपदाच्या प्रशिक्षणासाठी शिकागो (अमेरिका) येथे जात असलेल्या उपप्रांतपाल सुनील देसरडा यांना या वेळी निरोप देण्यात आला. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी वेळेचे नियोजन, गरजांची प्राथमिकता याविषयी मार्गदर्शन केले.

पुरस्कारांचे वितरण : लायन्समधील समग्र सेवा कार्याबद्दल विविध पुरस्कारांचे या वेळी वितरण करण्यात आले. यात राजेश राऊत यांना (कर्मयोगी पुरस्कार) लायन्स भूषण-तनसुख झांबड, राजेश भारुका, सुरेश क्षेत्रीय, सर्व्हिस आयकॉन अवॉर्ड महावीर पाटणी, प्रशांत वर्मा आदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सिडको उड्डाणपुलाचे सुशोभीकरण करणार डॉ. भागवत कराड यांनी शहर सुशोभीकरणाबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद देताना सिडको उड्डाणपुलाच्या सजावटीसाठी लायन्स क्लबतर्फे योगदान दिले जाईल, असे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...