आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग भास्कर:छोटा आरजेमध्ये आज ऐका श्रीतेजला ; 94.3 माय एफएमतर्फे छोटा आरजे सीझन -3

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छोटा आरजे सीझन-३ च्या तिसऱ्या आठवड्यात छोटा आरजे श्रीतेज फनी ऑब्झर्व्हेशन इन्सिडन्सबद्दल बोलणार आहे. ९४.३ माय एफएमवर छोटा आरजे सीझन-३ मध्ये निवडलेल्या श्रीतेजचा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ मध्ये प्रसारित केला जाणार आहे.दोन वर्षांप्रमाणे यंग भास्कर, ९४.३ माय एफएमतर्फे श्रोत्यांसाठी छोटा आरजे उपक्रम राबवला जात आहे. कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी यात मुलांचा व्हिडिओ पाठवून भाग घेतला. त्यातील काही निवडक मुलांची निवड झाली आहे.छोटा आरजे उपक्रमात भाग घेण्यासाठी ७ ते १२ वयोगटातील मुलांसाठी नोंदणी ठेवली होती. मुलांना एका मिनिटापर्यंत स्टोरी टेलिंग किंवा मिमिक्रीचा व्हिडिओ पाठवायचा होता. यामध्ये शंभरपेक्षा मुलांनी सहभाग घेतला. त्यातून आठ जणांची निवड झाली आहे. दर शनिवारी श्रोत्यांना एका नवीन आरजेला ऐकायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...