आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग भास्कर:छोटा आरजेमध्ये उद्या ऐका श्रीनिधीला; 94.3 माय एफएमचा छोटा आरजे सीझन-3 ला प्रतिसाद

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटा आरजे सीझन-३च्या चौथ्या आठवड्याची छोट्या आरजेंसाठी श्रीनिधी भावसार या चिमुकलीची निवड झाली आहे. या कार्यक्रमात ती कविता, गोष्ट आणि विनोद सांगणार आहे. ९४.३ माय एफएमवर छोटा आरजे सीझन-३ मध्ये निवडलेल्या श्रीनिधीचा कार्यक्रम १० सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ मध्ये प्रसारित केला जाणार आहे.

मागील दोन वर्षांप्रमाणे याहीवर्षी यंग भास्कर आणि ९४.३ माय एफएमने श्रोत्यांसाठी छोटा आरजे हा उपक्रम राबवला आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी मुलांचा व्हिडिओ पाठवून भाग घेतला. त्यातील काही निवडक मुलांचीच निवड झाली आहे. उपक्रमात भाग घेण्यासाठी ७ ते १२ वयोगटातील मुलांसाठी रजिस्ट्रेशन ठेवले होते. ज्यात त्यांना एक मिनिटापर्यंत स्टोरी टेलिंग किंवा मिमिक्रीचा व्हिडिओ पाठवायचा होता. जवळपास शंभरपेक्षा जास्त मुलांनी नोंदणी करुन या उपक्रमात सहभाग घेतला. त्यातून फक्त आठ जणांचीच निवड झाली आहे. दर शनिवारी श्रोत्यांना एका नवीन छोटा आरजेला ऐकायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...