आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावयाच्या उतरत्या काळात खूप काही करावेसे वाटते, परंतु ताणतणाव, प्रकृती स्वास्थ्याच्या समस्या असतात. मात्र हे प्रश्न कायम असताना सकारात्मकतेने जीवन जगले पाहिजे. साहित्य आपल्याच जीवनाचे प्रतिबिंब असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वासुदेव मुलाटे यांनी केले. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने गुरुवारी सिडको एन-५ गीता भवनात द्वितीय ज्येष्ठांचे मराठी साहित्य संमेलन झाले. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भरत कुलकर्णी, माजी अध्यक्ष प्रा. रमेश कुलकर्णी, सचिव श्रीकांत पत्की यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुलाटे म्हणाले की, उतरत्या वयात ताण, आर्थिक तणाव, आरोग्याच्या अडचणी असतात. तुम्ही ज्याला सुख म्हणतात ते कधी हाती लागत नाही. मात्र मनाचे समाधान ज्याला असते तोच श्रीमंत असतो.
ग्रंथदिंडीतून सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा : सकाळी ग्रंथदिंडीचे श्रीराम जोशी, भरत कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मराठमोळ्या वेशभूषेत ग्रंथदिंडी काढली. ज्येष्ठ महिला नऊवारी घालून सहभागी होत्या. हातात फलक घेऊन स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा अशा घोषणा देण्यात आल्या.
आज होणारे कार्यक्रम
सकाळी १० वाजता संस्थेच्या लेखक व कवी यांच्या साहित्याचा परिचय व त्यांचा सत्कार दुपारी १ वाजता प्रसारमाध्यमे काळाची गरज, फायदे व दुष्परिणाम यावर परिसंवाद दुपारी ३.३० वाजता संगीत कार्यक्रम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.