आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 दिवसांत तयारी:चिमुकल्यांनी सांगितले, ऑनलाइन खरेदी करताना ओटीपीचा वापर करणे सुरक्षित

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन खरेदी करताना खरेदीची माहिती कुणालाही देऊ नका, इतर साइटवरही माहिती घेऊन मगच पेमेंट करा. एवढे करूनही फसवणूक झाली तर मात्र तत्काळ ग्राहक मंचाकडे तक्रार करा, असा सल्ला चिमुकले देत होते. विशेष म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत बच्चे कंपनी ग्राहक मंच, कायदे आणि अधिकार या विषयावर बोलत होती.

ज्ञानसागर माध्यमिक शाळेत कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे स्पर्धेची तयारी मुलांनी फक्त १५ दिवसांत केली. या वेळी अॅड. सचिन चव्हाण, अॅड. श्रीकांत मिश्रा यांनी ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली. फेरोज शेख, सय्यद अझरोद्दीन, संजय फटाकडे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. अध्यक्षस्थानी अॅड. मिर्झा जावेद बेग होते. मुख्याध्यापक विलास वाहूळ, बी. एल. चव्हाण उपस्थित होते. सचिन गवई यांनी सूत्रसंचालन, एम.बी.जाधव पाटील यांनी आभार मानले .

कशी होते फसवणूक { मागवण्यात आलेल्या एखाद्या वस्तूऐवजी दुसरीच वस्तू असणे { वेबसाइटवर देण्यात आलेल्या वर्णनापेक्षा पाठवण्यात आलेल्या वस्तूचा दर्जा वेगळा असणे { वस्तू खरेदीसाठी पूर्ण पैसे देऊनही वेळेत वस्तू न पोहोचणे, मागवण्यात आलेल्या वस्तूमध्ये त्रुटी असणे { वस्तू बदलून देण्यासाठी पाठपुरावा करूनही उत्तर न देणे, संपर्कासाठी आलेल्या क्रमांकावर उपलब्ध नसणे.

बातम्या आणखी आहेत...