आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विषय घेऊन बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. कागदपत्रे अपलोड करताना अडचणी आल्यास जवळच्या पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. या सुविधा केंद्रांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिली जाईल. त्यानुसार अर्ज निश्चिती करावी लागेल. डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४००, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क लागेल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे ३१ मार्च २०२३ पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.