आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकेकाळी नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांच्या श्रेणीत होते. मात्र, आज जगातील 500 विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील एकही विद्यापीठ नाही, ही गंभीर चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहीजे. नोकरी किंवा उद्योग केले पाहीजेत. यातून स्वत: सोबतच इतरांचीही प्रगती होते, असा सल्ला स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त महाव्यवस्थापक अंबादास रगडे यांनी दिला.
जटवाडा येथील ‘सारा वैभव’ मधील त्रिपिटक बुद्धविहार समितीने 205 व्या शौर्यदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी रगडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी आयएचएमचे प्रा. डॉ. सतिश पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी अशोक हिवराळे उपस्थित होते. विनोद मोरे यांनी प्रास्ताविकात भीमा काेरेगावच्या शौर्याची आणि त्रिपिटक बुद्धविहाराबद्दल सांगितले.
रगडे म्हणाले, प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. आता जगाचा परिघ सर्वांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या संपूर्ण क्षमता आजमावल्या पाहीजेत, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पवार म्हणाले, आपल्याला सर्व जातीधर्मांना एकत्र येऊन काम केले पाहीजे. कारण, प्रतिगामी शक्तींचे संकट मोठे आहे. मंदिर, गुरुव्दारा, मशिद, बुद्धविहार आणि चर्चमध्ये चांगलेच संस्कार दिले जातात. त्यामुळे बुद्धविहार निर्मिती ही सर्वांची जबाबदारी आहे. विनोद मोरे सूत्रसंचालन तर किशोर म्हस्के यांनी आभार मानले.
महानगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे यांनी भीमा कोरगाव स्तंभाची प्रतिकृती याठिकाणी बनवून दिली. पराक्रमाची आठवण देणारा हा स्तंभ विशेष आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.