आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराते रुग्णालयासारखे नव्हे तर एखाद्या सेव्हन स्टार हॉटेलसारखे दिसत होते. या बुधवारी भोपाळमध्ये त्याच्या उद्घाटन समारंभात मी उभा होतो. अपोलो हॉस्पिटल बिलासपूरमध्ये मटेरियल खरेदीचे व्यवस्थापन करणारे मधू काल्डा, ऑपरेशन्स-पब्लिक रिलेशन्सवर देखरेख करणारे देवेश गोपाल, लॅब सर्व्हिसेस मॅनेज करणारे आलोक डॅनियल आणि रुग्णांच्या नोंदी हाताळणारे दीपक शरद अचानक मला पाहून आले आणि त्यांनी हाय-हॅलो केले. माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आला की, बिलासपूरसारख्या शहरात हेल्थकेअरचे इतके मोठे ब्रँड कसे काय आले ? तर भोपाळमध्ये तोच ब्रँड बुधवारी आले त्याच्या उद्घाटन समारंभातही मला आमंत्रित केले होते. दीपकने मला सांगितले की, बिलासपूरमध्ये एनटीपीसी, कोल इंडिया सारख्या कॉर्पोरेट्स आहेत, ते वीज, सिमेंट चुना आदीचे उत्पादन करतात आणि रेल्वेसारख्या मोठ्या संघटना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी सजग आहेत. त्यामुळे अपोलो सारखे ब्रँड आधी बिलासपूरमध्ये आले, ते शहर मप्रची राजधानी भोपाळपेक्षा बरेच लहान आहे. कदाचित तेच योग्य होते. ज्या शहरात एकही मोठे कॉर्पोरेट नाही अशा शहरात अचानक काही रुग्णालये का आली? याचे मला आश्चर्य वाटले. भोपाळ शिवाय पहिले शहर म्हणजे जैसलमेर. मे २०२१ मध्ये, प्रिया ग्रुप ऑफ हॉटेल्सनी जैसलमेरमध्ये ११४ खाटांचे पहिले मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उघडले होते. अशा ठिकाणी जेथे आरोग्याच्या मूलभूत गोष्टीसाठी शेकडो किमी दूर जावे लागत होते. तेथे त्याची सुरुवात १९९६मध्ये झाली, त्यात आपल्या कुटुंबातील एका दुःखद घटनेनंतर एका १३ वर्षाच्या मुलाने स्वत:शी गाठ बांधली होती. मद्रास (चेन्नई) वरुन रामेश्वरम जाणाऱ्या त्या मुलाच्या वडिलांना बद्री प्रसाद भाटिया यांना वृद्धाचलम स्टेशनजवळ रेल्वेत हार्टअटॅक आला. तीन तासांच्या मृत्यूशी झुंज देताना ऑक्सिजन सिलिंडरसारखी प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर मयंक भाटिया (आता ३९) यांनी स्वत: ला वचन दिले, ते त्यांच्या मूळ गावी जैसलमेरमध्ये एक रुग्णालय सुरू करतील, जेणेकरून त्यांच्या शहरातील इतर कोणालाही अशी आपत्कालीन परिस्थिती सहन करावी लागणार नाही. पुण्याचे मधू सागर (भारत पेट्रोलियमचे एक्स-सीजीएम) आपल्या ७५ वर्षाच्या नीलम दुग्गल बहिणीसोबत सुटी घालवत होते. तेथे अचानक त्यांच्या बहिणीला अॅक्युट गॅस्ट्रोएन्टरायटिस (एकेआय)चा त्रास उद्भवला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना चार दिवसानंतर त्यांना पुण्यात आणले गेले. संजीव अग्रवाल, सीएमडी, सेझ समूह, त्यांनी भोपाळमध्ये ३०० बेडचे ‘सेझ अपोलो हॉस्पिटल’ अत्याधुनिक मशीन्ससह सुरू केले. त्यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या एका पुतण्याला कोणत्याही रुग्णालयात बेड मिळत नव्हता. ४८ तासाच्या संघर्षानंतर त्याला एका रुग्णालयात दाखल करू शकले होते. त्याच दिवशी संजीव अग्रवाल यांनी स्वत:ला वचन दिले की, भोपाळच्या लोकांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही. या बुधवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्घाटनावेळी म्हणाले की, जो इतरांसाठी जगतो, त्याचे आयुष्य पूर्ण होते. }फंडा असा की, काही लोक आपले दु:ख सोडून माणुसकीसाठी खूप उदार मन ठेवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.