आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र ग्रामिण बँकेतर्फे 82 कोटीचे कर्जवाटप:सातही रिजनमध्ये 385 कोटींचे कर्ज वाटप

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने आयोजित एक्सपोमध्ये 82 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तर राज्यातल्या सातही विभागात 385 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील महिला अधिकारी वर्गाने पुढाकारातून ब्राईट फ्युचर्स एक्स्पो या कर्ज मंजूरी व वाटप उपक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.

बुधवारी ग्रामिण बँकेच्या वतीने ब्राईट फ्युचर एक्स्पोचे एका खासगी हाॅटेलमध्ये आयोजन करण्यात केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त अविनाश पाठक तसेच बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड,मुख्य सरव्यवस्थापक संजय वाघ विभागीय व्यवस्थापक वसंत बुरकुल यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात 82 कोटी वाटप

या ऐस्पो च्या माध्यमातून बँकेच्या गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यावसायिक कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, डाॅक्टरांना कर्ज असे विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. कर्ज कागदपत्रांची छाननी करून त्वरीत कर्ज मंजूरी या माध्यमातून देण्यात आली. याबाबत संजय वाघ यांनी सांगितले की औरंगाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये 82 कोटी रुपयांची कर्जवाटप झालेले असून राज्यातील औरंगाबाद बीड लातूर परभणी नाशिक ठाणे अशी राज्यभरात 385 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

अधिकांऱ्यांनी घेतली मेहनत

औंरगाबाद जिल्ह्यातून शंभर पेक्षा आधिक लोकांना हे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेच्या वतीने 50 पेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये एक्सपो यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली असल्याची माहिती मार्केटिंग मॅनेजर मयूर पाटील यांनी सांगितले. तर महिला कर्मचारी व अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेत हा एक नवा आदर्श निर्माण केला असल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी सर्व महिला अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...