आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:औरंगाबादमध्ये पुन्हा लागणार लॉकडाऊन? उद्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत होणार निर्णय        

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाने कहर केला आहे. येथे रोज झपाट्याने रुग्ण वाढत आहे. याच कारणामुळे शहरात सोमवारी कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय होणार आहे. 

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन संदर्भात सोमवारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक यांची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे.  

औरंगाबादमध्ये सोमवारीच लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी विचारले असता सोमवारी याबाबत बैठक होणार आहे त्यामध्ये निर्णय घेतला जाईल मात्र लगेच सोमवारी संचारबंदी नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत केंद्रेकर यांनी देखील सांगितले की लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेऊन याचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी या सर्वांची मते जाणून घेण्यात येत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser