आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला हे दिल्लीच्या सर्व्हेवर ठरेल, पण ही जागा शिवसेनाच लढवणार; संजय शिरसाटांचा दावा

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत कुणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा शिवसेना-भाजप युतीला मजबुतीने लढायच्या आहेत. यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर कुणाला कोणती जागा याचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दिल्लीचा आदेश असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.

छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यास भाजप इच्छुक असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तयारीही सुरू केली आहे. यावर शिरसाट म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) होती. त्यामुळे ती पुन्हा शिवसेनेकडेच राहावी यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे ही जागा आम्हाला सोडावी यासाठी भाजपही प्रयत्न करत आहे. त्यांनी प्रयत्न करणे साहजिक आहे.

मात्र ही जागा शिवसेनेकडेच राहणार असून आम्हीच ही जागा लढवणार आहोत. सर्वेक्षणानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कोण जिंकू शकेल, याचा अंदाज आल्यानंतर त्या पक्षाकडे ती जागा दिली जाईल. पण ही जागा शिवसेनाच लढवणार. फक्त उमेदवार कोण असेल हे त्यानंतरच स्पष्ट होईल.

मला आदेश दिल्यास लोकसभा लढवणार

मला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यास सांगितल्यास मीही तयार आहे, असेही आमदार शिरसाट यांनी स्पष्ट केले.