आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आपल्या आजूबाजूला पाहा आणि हंगामानुसार खरेदी करा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुकानदार सध्या जे करत आहेत ते काही संकेत असतील तर आपण हिवाळ्यातील कपडे घेणे निदान सध्या तरी टाळावे. सर्वप्रथम रस्त्यांवरील जाहिरातींचे फलक पाहा. त्यात बॉलीवूड कलाकारांची छायाचित्रे गायब आहेत, नाही तर आतापर्यंत ते उबदार कपडे घालून बर्फात खेळताना दिसले असते! या आठवड्यात मी कामानिमित्त भोपाळ आणि इंदूरला गेलो होतो. माझ्या संपूर्ण रोड ट्रिपमध्ये मला हिवाळ्यातील उबदार कपड्यांनी सजलेले एकही मोठे दुकान दिसले नाही. शेजारच्या नेपाळ-तिबेटमधून येऊन रंगीबेरंगी स्वेटर विकण्यासाठी दुकाने थाटणारेही मोजकेच होते. हिवाळ्यात होणारा विलंब हे त्याचे कारण असू शकते. या काळात मी या दोन्ही ठिकाणी थांबलो, जिथे सकाळी गरमी होती, संध्याकाळी हलकी थंडी आणि हिवाळ्यातील उबदार कपड्यांची गरज नव्हती. मंगळवारी सकाळी खूप उकाडा होता आणि कामाच्या वेळी घाम फुटत होता. आणि त्याच शहरात पहाटे २ नंतर अचानक थंडी पडली. मी घरी परतणार होतो तेवढ्यात हवेत गारवा पसरला.

इंदूर विमानतळाच्या आत जाताच मला दिसले की, गेल्या वर्षीपर्यंत हिवाळ्यातील उबदार कपड्यांची पाच दुकाने इथून शहरातील नवीन मॉलमध्ये स्थलांतरित झाली आहेत आणि विमानतळावरील बाकीच्या दुकानांमध्येही हिवाळ्यातील हलके कपडे विकले जातात. काही प्रवाशांनी, विशेषत: वृद्धांनी हिवाळ्यातील उबदार कपडे घातले होते. येथून उत्तर आणि पूर्व भारताच्या सर्व कानाकोपऱ्यात विमाने होती, याचा अर्थ प्रवाशांना हे चांगले ठाऊक होते की, देशाच्या त्या भागातही हवामान फार थंड नाही. तेव्हा मला जाणवले की, हिवाळा उशिरा सुरू झाल्यामुळे हंगाम तुलनेने छोटा असेल त्यामुळे दुकानदारांनी हलक्या प्री-विंटर कपड्यांचा साठा केला, कारण ते जड कपड्यांपेक्षा सुरक्षित आहेत. विमानतळावर गर्दी होती, सर्वत्र प्रवासी जास्त होते.

त्यामुळे एअरलाइनने ए ३२० (१८० आसने) च्या जागी ए ३२१ (२२२ आसने) आणले होते आणि प्रत्येक आसन भरले होते. एअरलाइन्स साधारणपणे डिसेंबरच्या मध्यात विमानात उष्ण पेयांचा साठा करतात, पण या मंगळवारी तीन जण सोडून इतर सर्वांनी थंड पेय घेतले! यात आश्चर्य नाही की, यापूर्वी विक्रीत घट झालेल्या आइस्क्रीम-सॉफ्ट ड्रिंक निर्मात्यांनी उत्पादन वाढवले आहे, तर उबदार जड कपड्यांच्या विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात साठा कमी केला आहे. हवामान तज्ज्ञांचे माहित नाही, परंतु किरकोळ तज्ज्ञांनी हिवाळ्याच्या काळात लक्षणीय घट आणि हिवाळ्यातील जड कपडे खरेदी करणाऱ्या कमी ग्राहकांचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे इंदूर या शहरातील सोन्याचा मुलामा असलेली कुल्फी ३०० रुपये प्रति नगाप्रमाणे उपलब्ध आहे. ती डिसेंबरच्या मध्यात सोशल मीडियावर चर्चेत आहे, हे हिवाळा शिखरावर नसल्याचे लक्षण आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात वाळवंटाच्या शिबिरात पर्यटक संख्या कमी होती.

बातम्या आणखी आहेत...