आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:मनुष्याच्या अंतःकरणातील अंधकार प्रकाशमय होण्यासाठी प्रेम, स्नेह, आत्मीयतेची गरज : जोशी

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा ‘रेडिओ देवगिरीचा’ लोकार्पण सोहळा

छोट्या क्षेत्रातील प्रतिभांना देवगिरी रेडिओच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रत्येकाने त्याचा यथायोग्य उपयोग करून घ्यायला हवा. सेवेचा जन्म हा संवेदनशीलतेतून होतो. शील असलेली व्यक्तीच खऱ्या अर्थाने वेगळ्या दिशेने वाटचाल करीत राहते. प्रेम, स्नेह आणि आत्मीयता दिल्याने मनुष्याच्या अंतःकरणातील सर्व अंधकार प्रकाशमय होऊ शकतो, असा सल्ला रा. स्व. संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी दिला. लहुजी साळवे आरोग्य केंद्रात आयोजित देवगिरी रेडिओच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, संजीव ऑटो पार्ट‌्सचे संजीव तांबोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कन्हैयालाल शहा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, उद्योजक तथा संस्थेचे विश्वस्त शिरीष कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा सेवापथ सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही संस्था शहरी व ग्रामीण विविध समाजोपयोगी काम करते. संस्था शहरी व ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण, कृषिविकास, किशोरी विकास, विद्यार्थी विकास इत्यादी क्षेत्रांत शहरातील ६८ सेवावस्त्या आणि पाच जिल्ह्यांतील २८० गावांत गेल्या ३२ वर्षांपासून कार्यरत आहे.

लोकशिक्षण, प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून कम्युनिटी रेडिओकडे पहिले जाते. संस्थेअंतर्गत कार्यरत विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळावी तसेच विविध सामाजिक चळवळींचे मोठे केंद्र निर्माण व्हावे या दृष्टीने या रेडिओकडे पाहिले जाईल, असेही जोशी म्हणाले. याच कार्यक्रमात किशोरी विकास प्रकल्प व विद्यार्थी विकास प्रकल्पाच्या विद्यापती महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लोकनाट्य, लोकगीत व पोवाड्याचे सादरीकरण केले. ज्योती शितोळे, विजय उकलगावकर यांनी सूत्रसंचालन केले. रेडिओ देवगिरीचे केंद्र निदेशक लक्ष्मीकांत धोंड यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी समाणे यांनी गीत सादर केले. संस्थेचे कार्यवाह डॉ. सुहास आजगावकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...