आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शिक्षण:ऑनलाइन शिकताना प्रेम; करमाळ्याची मुलगी मुलाला भेटायला थेट भुसावळात

करमाळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • एक दिवस मुलीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट आली.

दहावीची विद्यार्थिनी ऑनलाइन वर्ग करतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाच्या प्रेमात पडली. भेटीच्या ओढीने मुलीने करमाळ्यातून थेट भुसावळ गाठले. कोळगाव (ता. करमाळा) येथील दहावीची विद्यार्थिनी सुनीता (नाव बदलले आहे) मोबाइलवर ऑनलाइन वर्ग करायची. मात्र, ऑनलाइन वर्ग करतानाच मुलगी सोशल मीडियाचाही वापर सातत्याने करायची. याबाबत पालकांना काहीही माहिती नव्हते.

एक दिवस मुलीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकाली. त्यानंतर दोघांत चॅटिंग सुरू झाले. पाहता पाहता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही भेटीची ओढ लागली. त्यानुसार त्यांनी भेटायचे ठरवले. मात्र, यात अडचण ठरली ती गावाची. मुलगी करमाळा, तर मुलगा हा भुसावळचा रहिवासी. यावरही दोघांनी मध्य मार्ग निवडून परंड्याला भेटण्याचे ठरवले.

त्यानुसार ते भेटले. मुलगी घरात नसल्याचे पाहून पालकांनी बराच शोध घेतला. मात्र ती काही सापडली नाही. मुलीचे पालक पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले असताना त्यांना थेट भुसावळ येथून पोलिसांचाच फोन आला. पोलिसांनी मुलगी आमच्या ताब्यात असल्याचे सांगितल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला.

गावातील मुलांमुळे घटना उघडकीस
मुलगी भुसावळ तालुक्यातील मुलाच्या गावात गेली. तिथे त्याच्या घराची चौकशी करत असताना काही मुलांना तिचा संशय आला. संबंधित मुलगा तेव्हा शेतात गेला होता. नंतर या मुलांनी गावच्या पोलिस पाटलांना या मुलीची माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटलांनी मुलीला तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मुलीने सर्व हकिगत सांगितली. पोलिसांनी मुलीला व मुलाला समज देऊन संबंधित मुलीच्या पालकांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...