आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले; आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडमध्ये एका तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. तरुणी नांदेड जिल्ह्यातील शेळगावची रहिवासी होती. ती शुक्रवारी संध्याकाळी पुण्यावरुन एका तरुणासोबत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. तरुणाने तिला मध्यरात्री 2-3 वाजेच्या सुमारास येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

ही घटना घडल्यानंतर 12 तास तरुणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिले. यावेळी त्यांना तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव अविनाश राजुरे आहे. सध्या तो फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 326A आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...