आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:आज कमी दाबाने, उशिराने पाणीपुरवठा; धनगावजवळ जलवाहिनी फुटली, पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा लागली गळती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमीची जलवाहिनी १५ दिवसांत दुसऱ्यांदा रविवारी सकाळी १०.३० वाजता धनगावजवळ फुटली. संध्याकाळपर्यंत मनपाच्या पथकाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. मात्र, पाणी उपसा काही काळ बंद असल्यामुळे सोमवारी (४ एप्रिल) शहरातील काही भागांत कमी दाबाने, तर काही भागात उशिराने पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० आणि ७०० मिमीच्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार फुटत आहेत. रविवारी धनगावजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचे उंच कारंजे उडत होते. शेकडो लिटर पाणी वाहून गेले. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने या योजनेवरील पाणी उपसा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारी चार वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून वाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला. दरम्यानच्या काळात सुमारे साडेपाच ते सहा तास जुन्या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे पूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम जाणवेल. सोमवारी पाणी सोडले जाईल, मात्र काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत नियोजित वेळेपेक्षा एक-दोन तास उशिराने, असे धांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...