आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशात कला शाखेला कमी प्रतिसाद:10 ते 15 टक्केच प्रवेश, दरवर्षीप्रमाणे विज्ञान-वाणिज्यकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेत दहावीला मिळालेले सर्वाधिक गुण पाहून विज्ञान अथवा वाणिज्य शाखेला प्रवेश घेण्याचे प्रमाण अधिक आहे. ती टक्केवारी 80 ते 85 टक्के असून, कलाशाखेला मात्र कमी प्रतिसाद मिळत आहे. केवळ 10 ते 15 टक्केच विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेत असल्याचे तज्ज्ञांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सर्व घरांमध्ये कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा याबाबत आई-बाबांसह कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील व्यक्तींच्या सूचना ऐकूण घेतल्या जातात. विद्यार्थ्यांची क्षमता काय आहे यापेक्षाही विद्यार्थ्यांना मिळालेले गुण यानुसार शाखेची निवड केल्यानेच प्रवेश प्रक्रियेत हा फरक दिसत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रातवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी तर परीक्षाच झाल्या नसल्याने मागील इयत्तेच्या मूल्यांकनाच्या आधारावर निकाल जाहिर करण्यात आला होता. ज्यात गुणांचा फुगवटा वाढला.

80 ते 85 टक्के प्रवेश विज्ञानाला

मोठ्या प्रमाणात 80 ते 90, 95 टक्के गुण विद्यार्थ्यांना मिळाले. आजही आपल्याकडे विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेण्यापेक्षाही गुण जास्त मिळालेत त्यानुसार इंजिनिअरिंग, मेडिकललाच जायचे असे ठरवले जाते. इतरही शाखा महत्त्वाच्या आहेत. त्याचा फारसा विचार न केल्यानेच 80 ते 85 टक्के प्रवेश हे विज्ञान आणि वाणिज्य शाखेत तर १० ते १५ टक्के प्रवेश हे कलाशाखेत झाल्याचे चित्र अकरावी प्रवेशात दिसून येत आहे.

कला शाखेला 10 टक्केच मागणी

कला शाखेला सर्वात कमी प्रतिसाद अकरावी प्रवेश प्रक्रियेत मिळत आहे. केवळ 10 टक्के प्रवेश असून, जास्त गुण मिळाले म्हणून मेडिकल, इंजिनिअरिंगलाच जायला हवे या भावनेतून हे प्रवेश होतात. बेसिक शिक्षणही आवश्यक आहे. हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील शाखा निवडतांना लक्षात घेणे आवश्यक आहे. शाळांमध्येे होणाऱ्या कल चाचणीतूनही हेच दिसते की, शेजारचा प्रवेश घेतो आहे ना मग मी देखील त्याच शाखेला प्रवेश घ्यावा असे चित्र असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख यांनी सांगितले.

पालकांचा क्षमतेपेक्षा गुणांवर विश्वास

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या तुलनेत कलाशाखेला प्रतिसाद कमी आहे. याला गुणांचा फुगवटा कारणीभूत आहे. तसेच पालक देखील याचे कारण प्रत्येकजण मिळालेल्या गुणांवर विश्वास ठेवताे परंतु मुलांच्या आवड-निवड आणि क्षमतेवर नाही. सामाजिक स्थितीचा विचार करुन शाखा निवड होते. त्याचाच परिणाम अकरावी प्रवेश प्रक्रियेत दिसतो आहे. बेसिक विषय, कलाशाखा देखील करिअरसाठी चांगली संधी असल्याचे देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.जी.गायकवाड म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...