आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजीएन एलपीजी:प्रवाशांना जीवितास धोका शहरात धावताहेत विनातपासणी एलपीजी ऑटोरिक्षा, चारचाकी वाहने

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन व आरटीओच्या नियमानुसार एलपीजी किट लावलेल्या वाहनांची दर पाच वर्षांनी हायड्रो टेस्ट करणे बंधनकारक आहे. यासाठी वाळूज परिसरात केजीएन हायड्रो टेस्टिंग सेंटरला परवानगी दिली आहे. पण येथे वाहन व सिलिंडर न नेता १३०० रुपये दिले की तुम्हाला प्रमाणपत्र मिळते. या गौरखधंद्यामुळे तपासणी न केलेल्या एलपीजी वाहनापासून प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्याने एलपीजीवरील वाहनांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात अशी ३० हजार वाहने आहेत. गॅसवर वाहन चालवणे धोकादायक असल्यामुळे दर पाच वर्षांनी वाहनातील सिलिंडरची हायड्रो टेस्टिंग अनिवार्य केली आहे. मात्र, सेंटरचालक सिलिंडरची तपासणी न करता पैसे घेऊन प्रमाणपत्र देतात. यामुळे अनफिट एलपीजी वाहने धोकादायक बनली आहेत. आरटीओतील रिक्षाच्या सिलिंडरचे मिळवले प्रमाणपत्र : एमएच २० बीएफ ०२२४ ही चारचाकी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उभी एमएच २० ईएफ ५५१६ या एलपीजी ऑटोरिक्षाच्या सिलिंडरचा फोटो एजंटद्वारे केजीएन सेंटरकडे पाठवला. तेव्हा प्रति सिलिंडर १३०० रुपये शुल्क भरल्यानंतर कोणतीही तपासणी न करता दोन्ही प्रमाणपत्रे मिळाली. विशेष म्हणजे वाळूजला सेंटर असताना बाबा पेट्रोल पंपाजवळील म्हाडा कॉलनीतील एका गाळ्यातून हा गोरखधंदा सुरू आहे. आरटीओ प्रमाणपत्र बघतात आणि सोडून देतात आरटीओचे अधिकारी एलपीजी सिलिंडरची तपासणी कधी झाली, पेंट, लोगो आदींची पाहणी करत नाहीत. पैसे देऊन घेतलेले बोगस प्रमाणपत्र पाहून वाहनाचे पासिंग करतात. शुल्क आकारणीतही गोंधळ केजीएन सेंटरचे सुपरवायझर योगेश भाबळे म्हणाले, एका सिलिंडर तपासणीसाठी १५०० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, तपासणीविना प्रमाणपत्राबद्दल ते निरुत्तर झाले. तर केजीएन सेंटरचे मालक नबू पठाण यांनी १२०० रुपये शुल्क आकारले जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शुल्क आकारणीत गडबड असल्याचे स्पष्ट होते. केजीएन सेंटरचे मालक नबू पठाण काय म्हणतात... एलपीजी सिलिंडर तपासणीचे शुल्क किती घेता? }१२०० रुपये. तपासणी होते का, पैसे घेऊन प्रमाणपत्र देता? }वाहन व सिलिंडरची प्रत्यक्ष तपासणी न करता प्रमाणपत्र कसे दिले जाईल? आम्ही तपासणीविना दोन प्रमाणपत्रे तुमच्या केजीएन सेंटरकडूनच मिळवली आहेत. ती कशी काय दिली? }मला याबाबत तुमच्याकडूनच कळते आहे. एक मुलगा हे काम पाहतो. त्याने काही गैरप्रकार केला का ते मला पाहावे लागेल. आरटीओ संजय मैत्रेवार म्हणतात... एलपीजी सिलिंडरची तपासणी किती वर्षांनी करून घ्यावी, किती शुल्क आकारले जाते, तपासणी नाही केली तर काय कारवाई होते? }पाच वर्षांनी तपासणी करावी. मात्र, आता नवीन बदल झाले असतील तर मला खात्री करून घ्यावी लागेल. एलपीजी सिलिंडरचे तपासणी शुल्क वेगवेगळे असते. तपासणी केली नाही तर मोटार वाहन नियमाप्रमाणे दंडात्मक व परवाना रद्दची कारवाई केली जाते. आरटीओत एमएच २० ईएफ ५५१६ या क्रमांकाची ऑटोरिक्षा उभी असून केजीएन सेंटरमधून तिच्या सिलिंडरची तपासणी न करता.

बातम्या आणखी आहेत...