आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांबद्दल चुकीचे अहवाल:विभागीय आयुक्तांकडून कानउघडणीनंतर तपासणीसाठी जि. प.कडून 'ड्रॉ' पद्धतीचा वापर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळांबद्दल चुकीचे अहवाल सादर केले जातात. या विभागीय आयुक्तांच्या कानउघडणीनंतर जाग आलेल्या जि.प. शिक्षण विभागाने आता शाळा तपासणीसाठी लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला आहे. एका बरणीत भरलेल्या जिल्ह्यातील शाळांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून त्यातील एका भागातील शाळांची तपासणी केली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात हतनुर येथील काही शाळांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या अचानक भेटीदरम्यान शाळांमध्ये महापुरुषांच्या जयंती - पुण्यतिथी साजरी केली जात नाही. परमवीरचक्र विजेते, शास्त्रज्ञाने फोटो नाहीत. साधी महापुरुषांविषयीची माहिती देखील विद्यार्थ्यांना सांगता आली नव्हती. यावरुन शिक्षण विभागाद्वारे किती चुकीच्या पद्धतीचे अहवाल सादर केले जातात. विद्यार्थ्यांना काय शिकवले जाते. याची सर्व पोलखोल झाली होती. यावरुन विभागीय आयुक्तांनी सर्व शाळांच्या तपासणीच्या सूचनाही दिल्या तसेच गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांनाही निलंबित केलेे होते.

या प्रकारानंतर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने कुणालाही टार्गेट करुन नव्हे तर सर्वच शाळांची दर आठ दिवसाला तपासणी सुरू केली आहे. ही तपासणी अचानक केली जात असून, त्यासाठी कोणत्या भागातील तपासणी कधी, केंव्हा करायची. यासाठी लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. महिनाभरात 256 शाळांची तपासणी ही गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्वत: शिक्षणाधिकारी देखील शाळांची तपासणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुणाला टार्गेट नाही

ड्रॉ काढण्याचा उद्देश कोणत्याही शाळांना टार्गेट करणे नाही. तर विद्यार्थी गुणवत्तोसाठी शाळांनी दिलेले नियम पाळले पाहिजे. त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. शाळा ज्या पद्धतीची माहिती शिक्षण विभागाला सादर करतात. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थी सुविधा आहेत की नाही. त्यांना चांगल्या पद्धतीने अध्ययन अध्यापन केले जात आहे की नाही. याची माहिती घेण्यासाठी ही ड्रॉ पद्धतीने शाळा तपासणी केली जात आहे.

- जयश्री चव्हाण, जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...