आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • The CPI (M) Politburo Also Strongly Protested Against Those Trying To Destabilize The Mahavikas Aghadi Government; Polit Bureau Member Dr. The Protest Was Registered In A Statement Issued By Ashok Dha

अशोक ढवळेंनी केले मत व्यक्त:मविआचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा माकपकडून निषेध; हे कृत्य लोकशाहीसाठी घातक

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांना ज्या पद्धतीने आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी या भाजप शासित दोन्ही राज्यांत नेण्यात आले. या घटनेचा भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.

पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘भाजप-शासित दोन्ही राज्यातील शासकीय यंत्रणांचा आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यासाठी गैरवापर करण्यात आला आहे. हे कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यात आले आहे. याच यंत्रणामार्फत महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदारांना देखील लक्ष्य केले जात आहे.’

अशा प्रकारे निर्लज्जपणे शासनयंत्रणेचा वापर करणे नवीन नाही, तर ती विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सातत्याने होत असलेल्या घटनाक्रमातील अजून एक पुढची घटना आता महाराष्ट्रात होत आहे. माकप पॉलिट ब्युरो सर्व लोकशाहीवादी घटकांना आवाहन करत आहे की, त्यांनी लोकशाहीला सुरुंग लावण्यासाठी केल्या गेलेल्या शासन यंत्रणेच्या गैरवापराच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पुढे यावे.

नेहमी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे बंडखोर आमदार आता इतर राज्यात आश्रयाला गेले आहेत. यामुळे राज्याच्या स्वाभिमानाला धक्का नाही पोचत का..? भाजपच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राची शान का खराब केली जात आहे..? तुम्ही फारच हिंमतवान होतात तर तुमचे बंड महाराष्ट्रातीलच एखाद्या हॉटेलमधून का नाही केले..? हे संधीसाधु राजकारण आहे. आम्ही सरकार अस्थिर करण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहोत असेही डॉ. अशोक ढ‌वळे यांनी म्हटले आहे.