आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारणा:भागीदाराने कंपनीतून परस्पर नेली मशिनरी ; जिवे मारण्याची दिली धमकी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा एमआयडीसीत स्वप्निल राधाकिसन यादव (३५, रा. दादासाहेब रूपवते मागासवर्गीय सोसायटी, घुलेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी भागीदारीमध्ये कंपनी सुरू केली होती. त्यांना न सांगताच त्यांचे भागीदार राजेश बाबुभाई नारिया, किशनचंद नागोरी, दीपक प्रवीणभाई दोडिया (सर्व रा. मुंबई), नन्ने भाई, संतोष पाटील (रा. चबुतरे, ता. पाचोरा, जि.जळगाव), दीपकभाई बोसमिया (कांदिवली वेस्ट, मुंबई) आणि अतुल त्रिवेदी हे मशिनरी घेऊन गेले. यादव यांनी मशिनरी नेल्याबाबत विचारणा केली तेव्हा आरोपींनी त्यांना रस्त्यावर जिवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली.

बातम्या आणखी आहेत...