आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा प्रकल्प केंद्र:कचऱ्याचे ढिगारे नष्ट करण्यासाठी सहा कोटींची मशिनरी खरेदी करणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारेगावचा कचरा डेपो बंद होऊन पाच वर्षे झाली तरी तेथील कचऱ्याचे डोंगर जैसे थे आहेत. तसेच नव्याने सुरू केेलेल्या तीन कचरा प्रकल्प केंद्रांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. ते नष्ट करण्यासाठी बायोमायनिंग करण्यात येणार आहे. यासाठी सहा कोटी ५२ लाख ९० हजार रुपयांची मशिनरी खरेदी केली जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात दोन कोटी सहा लाख बायोमायनिंग मशीन, दोन कोटी ५० लाख ९० हजारांचे सात टिप्पर, एक कोटी ९६ लाखांच्या सहा स्वॅपिंग मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या ३२ कोटींच्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...