आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:वापरलेले पीपीई किट घालून गावभर फिरली वेडसर व्यक्ती, संसर्ग पसरवल्याची भीती; परळीतील धक्कादायक घटना

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा उपकरणांची विल्हेवाट करण्याची गरज

रुग्णांनी वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील परळीमध्ये घडला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर फेकलेले पीपीई किट एका वेडसर माणसाने घालून परळीत फिरल्याचे काल(दि.25) निदर्शनास आले. यामुळे हा सुपर स्प्रेडर बनण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी रुग्णांनी वापरलेले पीपीई कीट आणि मास्क एका वेडसर व्यक्तीच्या हाती लागले. त्या व्यक्तीने ते पीपीई कीट घालून परळीच्या रस्त्यावर फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरातून होणारे प्रयत्न लक्षात घेता हा प्रकार धक्कादायक आहे. दुर्देवाने असाच एखादा व्यक्ती 'सुपरस्प्रेडर' बनुन धोकादायक ठरू शकतो, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी संबधीत अधिकारी यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सुरक्षा उपकरणांची विल्हेवाट करण्याची गरज
परळीच्या कचरा संकलनात रुग्णांनी वापरलेली सुरक्षा उपकरणे फेकली जात आहेत. वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा खच रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे. पीपीई किटचा कचऱ्याची विल्हेपाट जिथल्या तिथे झाला पाहिजे, परंतु हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब बनली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे.

इनपुट- रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...