आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड येथील मठाधिपती सद्गुरू माधवानंद महाराज यांच्या तीनदिवसीय अमृतमहोत्सवाचा समारोप नुकताच झाला. तिसऱ्या दिवशीही भक्तांची अलोट गर्दी उसळली. तीन दिवस चाललेल्या रक्तदान शिबिरात १०१ दात्यांनी रक्तदान केले.सप्तपदी मंगल कार्यालयात हा अमृतमहोत्सव झाला. समारोपाच्या दिवशी भक्तांनी माधवानंद महाराजांवर पुष्पवृष्टी केली. शंभरपेक्षा अधिक ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पुण्याहवाचन शतरुद्री (शतौषधीय वनस्पतींच्या अर्काचा विश्वंभराला अभिषेक) करण्यात आला.
त्यानंतर शतरुद्राभिषेक तीर्थांचे श्रींना स्नान, चतुर्दश प्रणवयुक्त महामृत्युंजय जप, संपुटित शतचंडी, यजुर्वेद संहिता पारायण, महादेवास बिल्व पत्रार्पण, श्री सद्गुरू दर्शन, गुरुमंत्र, पाद्यपूजा, तुलादान करण्यात आले. द्वादश ज्योतिर्लिंगार्चन, अभिषेक, प्रदोष पूजा व पंचपदी आदी कार्यक्रम झाले. तीन दिवस भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. संयोजक अशोक उपाध्ये, संदीप माहोरकर, रक्तपेढीचे कृष्णा कुलकर्णी, मनीषा मुसळे, स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.