आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यावरील मोटार चोरून धूम ठोकणाऱ्याला बेड्या:आरोपीला 22 नोव्‍हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्‍याचे न्‍यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेततळ्यावरील मोटार चोरुन कारमधून धूम ठोकणाऱ्या आरोपीला करमाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्‍याच्‍याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोटार पंपावरील लोखंडी कव्‍हर असा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

भिमराव रामभाऊ सरोदे (31, रा. सांजखेडा ता.जि. औरंगाबाद, ह.मु. हनुमान चौक, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव असून त्‍याला 22 नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग एस.जी. गुणारी न्‍यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (18 नोव्हेंबरला ) दिले.

दरम्यान, काकासाहेब जिजाराव चौधरी (28, रा. दुधड ता.जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, 2 ते 3 मार्च दरम्यान आरोपीने फिर्यादीच्‍या शेतातील शेत तळ्यातील मोटारीसह गावातील संतोष चौधरी यांच्‍या शेतातील शेत तळ्यातील पाण्‍याची मोटार चोरुन नेली. प्रकरणात करमाड पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असतांना प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार बळीराम चौधरी यांनी सांगितले की, 2 मार्च रोजी रात्री 8.00 वाजता ते शेतात पाणी भरण्‍यासाठी जात होते. त्‍यावेळी त्‍यांना गावातील लक्ष्‍मण चौधरी भेटले, दोघे गप्पा मारत असतांना त्‍यांच्‍या पासून थोड्या अंतराव लाड सावंगी रोड लगत एक कार (क्रं. एमएच-20-ईजी-8350) उभी दिसली. त्‍या कारच्‍या डीक्कीत एक व्‍यक्ती पाण्‍याची मोटार ठेवत होता. परंतु शेतात पाणी भरण्‍यासाठी मोटार बदलवीत असेल असे वाटल्यांनी त्‍यांनी दुर्लक्ष केले. थोड्यावेळाने तेथे संपत चौधरी आले, त्‍यांनी शेततळ्यातील मोटार चोरीला गेल्याचे सांगितले. त्‍यामुळे कारमध्‍ये मोटार ठेवणार्या व्यक्तीचा त्‍यांना संशय आला. ते दुचाकीवर कारकडे निघाले, मात्र चोरट्याला त्‍यांची चाहुल लागल्याने कार घेवून त्‍याने धूम ठोकली. चौधरींनी तब्बल लाडसावंगी पर्यंत आरोपीचा पाठलाग केला मात्र तो पसार झाला.

पोलिसांनी कारच्‍या क्रमांकावरुन कार मालकाची चौकशी केली असता, भिमराव सरोदे याने पेशंट सोडण्‍यासाठी म्हणुन गाडी घेवुन गेला होता अशी माहिती दिली. त्‍यानूसार आरोपीला अटक केली असता त्‍याने गुन्‍ह्यात कार मालक सचिन चव्‍हाण याचा देखील समावेश असल्याची कबुली दिली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील उध्‍दव वाघ यांनी पसार आरोपी सचिन चव्‍हाण याला अटक करायची आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास करायचा आहे. गुन्‍ह्यात चोरलेल्या मोटार जप्‍त करायच्‍या असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...