आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआवास अभियान:विभागात औरंगाबाद प्रथम, उस्मानाबाद द्वितीय तर हिंगोली जिल्हयाला तृतीय क्रमांक, शुक्रवारी होणार पारितोषीक वितरण

हिंगोली23 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • कोविडच्या नियमांचे पालन करूनच पुरस्कार वितरण

मराठवाड्यात महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्हयाने प्रथम, उस्मानाबादने द्वितीय तर हिंगोली जिल्हयाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. शुक्रवारी ता. 3 दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी राज्यात महा आवास अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पारितोषीक देखील ठेवण्यात आले होते.

जिल्हास्तरीय पारितोषीक जाहीर झाल्यानंतर विभागीय स्तरीय निकालाची प्रतिक्षा विभागातील जिल्हयांना लागली होती. त्यानुसार या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीचे मुल्यमापन करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींच्याही कामाचे मुल्यमापन करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागाचा निकाल जाहिर झाला आहे.

पंतप्रधान आवास योजना
सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद
- प्रथम औरंगाबाद, द्वितीय उस्मानाबाद, तृतीय हिंगोली.
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती - प्रथम खुलताबाद, द्वितीय पालम, तृतीय वाशी.
सर्वोकृष्ट ग्रामपंचायत - प्रथम पारगाव (उस्मानाबाद), द्वितीय सावळदबारा (औरंगाबाद), तृतीय जळकीघाट (औरंगाबाद).
सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था - प्रथम महिंद्रा होम फायनान्स सेलू (जि. परभणी).
शासकिय जागा व वाळू उपलब्धता - प्रथम गटविकास अधिकारी व तहसीलदार पैठण, द्वितीय सिल्लोड, तृतीय औरंगाबाद यांचा समावेश आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजना
सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद
- प्रथम उस्मानाबाद, द्वितीय औरंगाबाद, तृतीय परभणी.
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती - प्रथम मानवत, द्वितीय लोहरा, तृतीय पालम.
सर्वोकृष्ट ग्रामपंचायत - प्रथम चुडावा (परभणी), द्वितीय धानुरी (उस्मानाबाद), तृतीय इरळद (परभणी).
सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था - प्रथम महिंद्रा होम फायनान्स सेलू (जि. परभणी).
शासकिय जागा व वाळू उपलब्धता - प्रथम गटविकास अधिकारी व तहसीलदार नायगाव (जि. नांदेड), द्वितीय वैजापूर (जि. औरंगाबाद)

कोविडच्या नियमांचे पालन करूनच पुरस्कार वितरण
कोविडच्या नियमांचे पालन करूनच पुरस्कार वितरण होणार आहे. जिल्हा पुरस्कारासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व प्रोग्रामर यांनाच उपस्थित राहता येणार आहे. तर पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक, वित्तीय संस्थेचे व्यवस्थापक यांना उपस्थित राहता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...