आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतुल सावेंचे आश्वासन:महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना 388 कोटींची फेलोशिप देणार, 36 जिल्ह्यांत 72 वसितगृहे सुरू करणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाज्योती फेलोशिपसाठी कागदपत्र पडताळणी झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांची आधी ऑनलाइन छाननी करू. त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या सर्वांनाच फेलोशिप देऊ. त्यासाठी ३८८ कोटी खर्च येणार असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस पैसे द्यायला तयार आहेत, असे आश्वासन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीतर्फे विद्यार्थी संवाद व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा सत्कार सोहळा झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, डॉ. प्रशांत अमृतकर, प्रवीण घुगे, डॉ. गजानन सानप, बळीराम जाधव यांची मंचावर उपस्थिती होती. सावे म्हणाले, “महाज्योतीसंदर्भात विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी निवेदने दिले. त्यानुसार २६ सप्टेंबरच्या बैठकीत अनेक ठराव घेतले. ओबीसींच्या मागण्या २०० टक्के देवेंद्र फडणवीस मान्य करतील. राज्य शासन महाज्योतीमार्फत ३६ जिल्ह्यांत विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अशी ७२ वसतिगृहे सुरू करणार आहे. ६० टक्के पैसे केंद्र शासन व ४० टक्के पैसे राज्य देईल. अर्धवट संशोधन सोडू नये म्हणून शपथपत्र करण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. डॉ. कालिदास भांगे, डॉ.टी आर पाटील, देवराज दराडे, महेंद्र मुंडे, विजय धनगर, विठ्ठल नागरे, आशिष लहासे, सोमनाथ चौरे, जयश्री भुस्कुटे, हनुमान रासवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...