आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेरुळ:महामंडलेश्वर भागवतानंद गिरीजी महाराज अनंतात विलीन

वेरुळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराजांचा वेरुळ परिसर आणि राज्यासह परराज्यातदेखील मोठा भक्त परिवार आहे.

श्री क्षेत्र वेरुळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज यांचे तीव्र हदय विकाराच्या धक्क्याने औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी निधन झाले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास समाधीचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर घटनेमुळे वेरुळ सह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करत आहे. महाराजांचा वेरुळ परिसर आणि राज्यासह परराज्यातदेखील मोठा भक्त परिवार आहे.

परंतु, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना या समाधीच्या कार्यक्रमास येणे शक्य नसल्याने अनेक भाविकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाधीचा कार्यक्रम पाहिला. यावेळी भक्त परिवारातील ठराविक प्रमुखासह महामंडलेश्वर मुक्तानंद गिरी महाराज , महंत स्वामी रामेश्वर महाराज , महंत स्वामी नित्यानंद महाराज , महंत गोपाल नंद महाराज , सरवानंद महाराज , महंत स्वामी भरतगिरी महाराज , महंत स्वामी नामदेव गिरी महाराज , स्वामी कैवल्यानंदजी महाराज यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...