आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेवाच्या जगातील सर्वात उंच मूर्तीचे निर्माण नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी येथे झाले आहे. रवींद्रकीर्ती स्वामी, डॉ.पन्नालाल पापडीवाल, जयचंद कासलीवाल आदी ७ जणांनी ट्रस्ट करून या कामाला सुरुवात केली.
या मूर्तीचा आंतरराष्ट्रीयस्तरावर १५ जूनपासून महामस्तकाभिषेक सुरू होणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे यासाठी सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डॉ. भागवत कराड, भारती पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आदींना निमंत्रण दिले आहे. कर्नाटक येथील सर्वोच्च श्रावक शिरोमणी धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्या निर्देशनानुसार विविध कामे केली जात आहेत.
यासाठी अधिष्ठाता सी.आर.पाटील, अनिलकुमार जैन, प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल, डॉ.जीवनप्रकाश जैन, विजयकुमार जैन, चंद्रशेखर कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल, महेंद्र काले, ललित पाटणी, कस्तुरचंद बडजाते, राजमल कासलीवाल, अभयकुमार कासलीवाल, विनोद लोहाडे, आनंद सेठी, केतन ठोले, नेमीचंद बाकलीवाल, शरद साहू, महावीर पाटणी, भरत ठोले, पवन पापडीवाल, विलास पहाडे, विजय पापडीवाल, सुमीत गंगवाल आदी सहकार्य करीत आहेत. मांगीतुंगी कलमश हेतू संजय पापडीवाल यांच्या निवासस्थानी आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर येथे कलश कुपन उपलब्ध आहेत. या महोत्सवात आर्यिका श्ररानमती माता, डॉ. प्रज्ञाश्रमणी आर्यिका, चंदनामती माता यांचे व्हर्चुअल सान्निध्य लाभणार आहे, असे प्रचार-प्रसार संयोजक पियुष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.