आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:कोरोनामुळे यंदाही 25 टक्के अभ्यासक्रमात कपात, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा सुरु करता आल्या नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदा देखील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावे, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा सुरु करता आल्या नाहीत. वेळेत शाळा सुरु करता न करता आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पुर्ण करणेबाबत समस्या निर्माण होवू शकते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करण्याबाबत शासनाचे विचारमंथन सुरु होते. सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याने शासनाने यावर्षी देखील 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद लवकरच जाहीर करणार आहे. याबाबत सहसचिव राजेंद्र पवार यांनी शासन निर्णय जाहिर केला आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे. तर अभ्यासक्रम कपात हा तात्पूर्ता उपाय असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षेत या अभ्यासक्रम कपातीमुळे अडचणी येतील असे शिक्षकांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...