आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांचे उद्योग:शेतकरी आत्महत्या होणाऱ्या राज्यात मंत्र्यांच्या शेती कंपन्यांचे उदंड पीक, महाराष्ट्रात शेती-व्यवसाय करणारे 76% मंत्री, त्यांचे 42% उद्योग शेतीपूरक

औरंगाबाद/नाशिक / दीप्ती राऊत / महेश जोशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या सन २०१९ च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक म्हणजे ३८% शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, मात्र या राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रिमंडळींचे कृषी उद्योग मात्र वेगाने समृद्ध होताना दिसत आहेत. "दिव्य मराठी'ने केलेल्या पडताळणीत राज्यातील ७६% मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत "शेती व व्यवसाय' असा सांगितला आहे, तर मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे नोंदलेल्या १६१ कंपन्या असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ४२ % कंपन्या शेतीपूरक व्यवसायांशी निगडित असल्याचे दिसते. यामध्ये ॲग्रो प्रॉडक्ट्स, ॲग्रो ट्रेड, ॲग्रो प्रोसेसिंग या कंपन्यांचा समावेश आहे. जे स्वत:च्या विकासासाठी मंत्र्यांना जमते ते राज्यातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी का नाही, हा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

अशी मिळवली माहिती
मिनिस्ट्री ऑफ कॉर्पाेरेट अफेअर्सच्या संकेतस्थळावर डीन (डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर) टाकल्यावर असणाऱ्या मालकी किंवा भागीदारी कंपन्यांची माहिती मिळते. याच डीन नंबरवर बंद झालेल्या कंपन्यांच्या माहितीसाठी अन्य संकेतस्थळांचा वापर करण्यात आला. या संकेतस्थळांनी ही माहिती कॉर्पाेरेट मंत्रालयाच्या संकेतस्थळाहूनच घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...