आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद @ 550:प्रथमच एकादिवसात सर्वाधिक काेराेना रुग्ण, राज्यात 8 दिवसांत तब्बल 69 हजार नवे रुग्ण

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे संकट दिवसेंदिवस गंभीर हाेत आहे. मंगळवारी दिवसभरात नव्या ५५० बाधित रुग्णांची नाेंद झाली, तर दाेन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरात प्रथमच जिल्ह्याने एकाच दिवशीच्या रुग्णसंख्येत पाचशेचा टप्पा आेलांडला आहे. यापूर्वी जेव्हा काेराेनाचा झपाट्याने संसर्ग सुरू हाेता त्या वेळीही सर्वाधिक ४८६ रुग्ण ८ सप्टेंबर २०२० राेजी सापडले हाेते. त्या दिवशी बळींची संख्या मात्र नऊ हाेती. याचाच अर्थ दुसऱ्या टप्प्यात गतवर्षीपेक्षाही झपाट्याने संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात मनपा हद्दीतील ३३७ व ग्रामीण भागातील ३६ अशा ३७३ जणांना डिस्चार्ज मिळाला. सध्या ३२२१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३,९०७ वर गेली तर बळींचा आकडा १३०४ झाला आहे. आतापर्यंत ४९,३८२ जण काेराेनामुक्त झाले आहेत.

रेल्वेस्टेशन, विमानतळावर २ पॉझिटिव्ह
महापालिकेतर्फे रेल्वेस्टेशनवर मंगळवारी ९८ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत २ जण काेराेनाबाधित आढळून आले. तसेच विमानतळावर ३८ प्रवाशांची चाचणी घेण्यात आली. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृतांमध्ये दाेन महिला, सहा पुरुष
मोरहिरा औरंगाबाद येथील ३२ वर्षीय पुरुष, वैजापुरातील ७५ वर्षीय पुरुष, चैतन्यनगरातील ४९ वर्षीय स्त्री, रेल्वेस्टेशन भागातील ५१ वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील ८४ वर्षीय पुरुष यांचा घाटीत मृत्यू झाला. माळीवाडा (ता. कन्नड) येथील ६५ वर्षीय पुरुष, शहरातील नॅशनल कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष आणि ६९ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

देशातील १० जिल्ह्यांत ४४% सक्रिय रुग्ण, आठ जिल्हे एकट्या महाराष्ट्राचे
नवी दिल्ली/मुंबई | देशात रोज १६ हजारांवर नवे रुग्ण आढळत आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातच १० हजारांपर्यंत रुग्णवाढ होत आहे. संसर्गाचा फैलाव बघता देशातील ७५% सक्रिय रुग्ण आता केवळ महाराष्ट्र व केरळातच आहेत. तीन महिन्यांपूर्वी देशातील ७५% सक्रिय रुग्ण १० राज्यांत होते. सक्रिय रुग्णांचा विस्तार जिल्ह्यांच्या हिशेबाने पाहिला तर देशातील एकूण ७४१ जिल्ह्यांपैकी केवळ १० जिल्ह्यांतच ४४% रुग्ण आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, महाराष्ट्रात महिनाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजारांवरून ९५ हजारांवर गेली. देशात १.८५ लाख सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात 8 दिवसांत तब्बल 69 हजार नवे रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्ण १६,२२९ ने वाढले; ५२,५०४ रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात काेरोना व्हायरसच्या संसर्गाने पुन्हा उचल खाल्ली आहे. यंदा २ मार्चपासून ९ मार्चपर्यंतच्या ८ दिवसांत राज्यात ६९ हजार ६८ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६,२२९ ने वाढली आहे. आठ दिवसांच्या काळात २१८ बाधितांचा बळी गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या काळात ५२,५०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...