आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. परंतु परीक्षा न देताच उत्तीर्ण होण्याचा हा आगळा वेगळा आनंद द्विगुणीत होऊ शकला नाही. ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पास की नापास कळण्यासाठी बोर्डातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता थोडावेळात पाहता येईल असे जुजबी उत्तर देण्यात आले.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येतात. परंतु गेल्या वर्षी पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळाच भरल्या नाहीत. तर कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षाही रद्द करत नववीच्या मूल्यांकनावर आधारित दहावीचे मूल्यांकन करत ऑनलाइन निकाल राज्यमंडळाच्या mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahasscboard.in वेबसाइटवर जाहिर केला. मात्र विद्यार्थ्यांना पाहता येत नसल्याने हिरमोड झाला आहे. २:३० वाजले तरी विद्यार्थ्यांना ते पास झालेत की नाही पाहता आलेले नाही. असे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सांगितले. या संदर्भात बोर्डातील अधिकाऱ्यांनाही पालकांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता एकाचवेळी अनेकजण वेबसाइट पाहत आहेत. तांत्रिक अडचण असून, राज्यमंडळ वेबसाइटवर संपूर्ण निकाल अपलोड करत असल्याने ही अडचण आहे. थोडावेळात तांत्रिक अडचण दूर होऊन निकाल पाहता येईल असे सांगितले.
वेबसाइट क्रॅश आणि बैठक क्रमांकही माहीत नाही -
दरम्यान निकालानंतर वेबसाइट क्रॅश झाली असतांनाच अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याने शाळांनी हॉलतिकीटच वितरित केले नाही. परिणामी निकाल जाहिर झाला असला तरी बैठक क्रमांक नसल्याने आम्ही निकाल पहावा तरी कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. तर आईचे नाव आणि जन्मतारीख टाकूनही निकाल पाहता येत असल्याचे मंडळाने यापूर्वी कळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थी म्हणतात...
निकाल जाहिर झाला पण वेबसाइट ओपन होत नसल्याने मला निकाल पाहता येत नाही. तर शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, उद्या दुपारी ३ वाजता पाहता येईल.त्यामुळे निकाला विषयी चिंता वाटते आहे. अभिज्ञा आसने - विद्यार्थीनी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.