आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धा:शानदार सुरुवात, महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेनाली (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ थ्रो बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने शानदार सुरूवात केली आहे. महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी सलग दोन विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. या संघाचे नेतृत्व औरंगाबादचा सुयश साळवे करत आहे. उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने तगड्या हरियाणा संघाचा 15 गुणांनी एकतर्फी पराभव केला. हरियाणासाठी हा मोठा धक्का ठरला.

सामन्यात महाराष्ट्राने वेगवान सुरुवात केली. संघाचा बचाव अतिशय भक्कम होता. चेंडूवर मिळवलेले नियंत्रण पाहून हरियाणाचे खेळाडू पहिल्या डावात एकही गुण घेवू शकले नाही. महाराष्ट्राने पहिला सेट 25-0 ने आपल्या नावे केला. कर्णधार सुयश साळवेने 7 गुणांची कमाई करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याचबरोबर, दुसऱ्या डावात हरियाणा संघाने थोडा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अखेरपर्यंत 10 गुण मिळवले. महाराष्ट्राने हा सामना 25-10 गुणांनी जिंकला.

उपांत्यपूर्व सामना तामिळनाडूशी

महाराष्ट्राचा उपकर्णधार राकेश वानखेडेने 4, मित कदमने 8 आणि सौरभ निकमने 6 गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता महाराष्ट्राचा उपांत्यपूर्व सामना तामिळनाडूशी होणार आहे. संघाला प्रशिक्षक सागर तांबे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

बातम्या आणखी आहेत...