आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद सभा:राज ठाकरेंच्या सभेत गर्दी दाखवण्याचा प्रयत्न, पण मुख्यमंत्र्यांची सभा रेकार्डब्रेक होणार - अंबादास दानवे

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आता औरंगाबादमध्ये धडाडणार असून, येत्या 8 जून रोजी त्यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली, तिथेच ही सभा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना ते काय उत्तर देणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबाद शिवसेनेचा 8 जून रोजी ​​​​वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त या सभेचे आयोजन करण्तयात आले आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली. मनसे प्रुमख राज ठाकरेंच्या सभेत गर्दी दाखवण्याचा प्रयत्न झाला, पण मुख्यमंत्र्यांची सभा रेकार्डब्रेक होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रेकॉर्ड मोडणार

मनसेच्या सभेत गर्दी दाखवण्यात आली होती. संख्या किती होती, हे पोलिस सांगतील. मात्र, शिवनसेची सभा नैसर्गिक असते. त्यासाठी शिवसेनेला मोर्चेबांधणी करावी लागत नाही. उद्धव ठाकरेंची सभा ही प्रंचड नाही तर विराट होणार आहे. ही सभा कुणाला उत्तर देण्यासाठी नाही. कोणाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी नाही. शिवसेनेचे रेकॉर्ड शिवसेनाच मोडते. बाकीच्या रेकार्डकडे पाहण्याची आम्हाला गरज नाही, असा दावाही दानवे यांनी केला.

मराठवाड्यातील पहिली शाखा

8 जून 1985 रोजी औरंगाबाद येथे शिवसेनेची मराठवाड्यातली पहिली शाखा स्थापन झाली. या शाखेच्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून उद्धव ठाकरे यांच्या सभेचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 मे ला मुंबईच्या बीकेसी मैदानावर उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यानंतर औरंगाबादची सभा होते आहे.

जिथे राज यांची सभा तिथेच उद्धव ठाकरे घेणार सभा -

औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण याच बालेकिल्ल्याला एमआयएमने खिंडार पाडायला सुरुवात केली. त्यानंतर आता राज यांनीही येथेच सभा घेत औरंगाबादेतील जनतेला आपल्याकडे आकर्षिक केले. त्या धर्तीवर उद्धव ठाकरे सभा होत आहे. शिवसेनेची औरंगाबादेतील पकड ते या सभेद्वार मजबुत करतील, असा दावा शिवसेनेकडून होत आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसह विरोधकांचा कशापद्धतीने समाचार घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...